शेअर बाजारात आज गुड मॉर्निंग! युद्धविरामाच्या निर्णयाचे स्वागत, निर्देशांक अडीच हजारांनी वधारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. इराणने स्ट्रेट ऑफ हॉरमुजमधून सुरक्षित मार्ग देण्यास सहमती दर्शवल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलखाली आल्या, याचा सकारात्मक परिणाम बाजारावर झाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याची घोषणा करत युद्धविराम जाहीर केला. या घडामोडींमुळे जागतिक बाजारातही तेजीचे वातावरण निर्माण झाले.

बुधवारी बाजार उघडताच मोठी उसळी दिसली

सेन्सेक्स 2,674.05 अंकांनी (3.58%) वाढून 77,290.63 वर उघडला तर निफ्टी 50 731.50 अंकांनी (3.16%) वाढून 23,855.15 वर सुरू झाला

दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या आरबीआयच्या रेपो दराच्या घोषणेकडे लागले आहे. महागाईचा अंदाज आणि पतधोरणाचा निर्णय बाजाराच्या पुढील दिशेवर प्रभाव टाकू शकतो.