
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध शमल्याने जगाने सुटकेचा निश्वास सोडला असतनाच आता जगात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. आता उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने बुधवारी अचानक तातडीची सूचना जारी केली. या सूचनेत म्हटले आहे की उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. जपान सरकारने तात्काळ सतर्कतेची घोषणा केली आणि सर्व संबंधित विभागांना सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर कोरिया गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. या चाचण्या जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसाठी मोठ्या चिंतेचा विषय बनल्या आहेत. जपान सरकारने सांगितले की, क्षेपणास्त्राची दिशा, उंची आणि अंतर याबद्दल माहिती मिळवण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने तातडीने सूचना जारी केली. जपान सरकारने देशभरात दक्षता वाढवली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा यंत्रणा क्षेपणास्त्राची दिशा आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
जपान उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हालचालींना खूप गांभीर्याने घेतो. जेव्हा उत्तर कोरिया क्षेपणास्त्र डागतो, तेव्हा जपानचे पंतप्रधान कार्यालय तात्काळ आणीबाणीची सूचना जारी करते. ही सूचना सरकारच्या संकट व्यवस्थापन पथकाला सक्रिय करते. सर्व मंत्रालये आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ माहिती गोळा करतात आणि जनतेला अद्ययावत माहिती देतात. जपान सरकारने सांगितले की क्षेपणास्त्र जपानच्या भूभागावर पडले नाही, परंतु देशव्यापी दक्षता वाढवण्यात आली आहे. पंतप्रधानांनी सर्व अधिकाऱ्यांना जनतेपर्यंत वेळेवर आणि अचूकपणे माहिती पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आपली लष्करी ताकद दाखवण्यासाठी आणि शेजारील देशांना इशारा देण्यासाठी वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या करतात. जपान आणि दक्षिण कोरियासोबतच्या अमेरिकेच्या लष्करी सरावांना प्रत्युत्तर म्हणूनही या चाचण्या घेतल्या जातात. उत्तर कोरिया याला आक्रमणाची तयारी मानतो.
गेल्या काही महिन्यांत, उत्तर कोरियाने कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि मल्टिपल रॉकेट लाँचरची चाचणी केली आहे. बहुतेक क्षेपणास्त्रे पूर्व समुद्रात (जपानचा समुद्र) डागण्यात आली आहेत. यावेळीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले. ते अत्यंत वेगाने उडते आणि लांब अंतर पार करू शकते.
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांचा सर्वाधिक परिणाम जपानवर होतो, कारण अनेक क्षेपणास्त्रे जपानच्या दिशेने डागली जातात. जपान सरकारने रहिवाशांना घरातच थांबण्याचा किंवा स्थलांतरित होण्याचा सल्ला देत वारंवार मोबाईल अलर्ट पाठवले आहेत.
दक्षिण कोरिया आणि अमेरिका देखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. हे तीन देश संयुक्तपणे उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हालचालींवर लक्ष ठेवतात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आधीपासूनच उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हालचालींवर लक्ष ठेवते. परंतु, परिषदेने क्षेपणास्त्र आणि अणुचाचण्यांवर बंदी घातली आहे, तरीही उत्तर कोरिया या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत आहे. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याने जगाची चिंता वाढली आहे.



























































