
गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन या अग्नीतांडव झालेल्या नाईटक्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. यामुळे लुथरा बंधूंच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा आहे. डिसेंबर 2025 मध्ये या क्लबमध्ये आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. आगप्रकरणाशी संबंधित प्रकरणात लुथरा बंधूंना या आधीच जामीन मिळाला होता.
म्हापुसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ज्यूड सिक्वेरा यांनी फसवणुकीच्या प्रकरणात आरोपींना नियमित जामीन मंजूर केला. या निकालानंतर लुथरा बंधूंची तुरुंगातून सुटका होईल, असे लुथरा बंधूंचे वकील पराग राव यांनी सांगितले.





























































