
जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी रस्त्यावर पेरलेले एक शक्तिशाली आयईडी स्फोटक सुरक्षा दलांनी निकामी केले. हे आयईडी सुरक्षा दलांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र वेळी ते निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली.
दक्षिण कश्मीर जिल्ह्यातील झैनापोरा-चितारगाम रोडवर बुधवारी पहाटे नियमित तपासणी मोहिमेदरम्यान हे आयईडी आढळून आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तपासणीत ती वस्तू एक शक्तिशाली ‘आयईडी’ (IED) असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने आयईडी निकामी केला.



























































