
बाजारात बऱ्याचदा ताजा माशांसोबत शिळे मासे देखील विकायला असतात. अनेकदा विक्रेते ताजा म्हणून आपल्याला शिळा माल खपवतात व आपली फसवणूक होते. दिवसेंदिवस मासळीचे दर वाढत चालले आहेत त्यात अशी फसवणूक झाली तर चांगलंच जीवाला लागतं. त्यामुळे मासे हे कायम व्यवस्थित स्वत: तपासूनच घ्यायचे.
बाजारात गेल्यावर तुम्ही या तीन पद्धती वापरून मासे ताजे की शिळे ते तपासू शकता.
माशाचे डोळे – ताजा माशाचे डोळे पाणीदार, चकाकणारे आणि बाहेरच्या बाजूला टणक असे दिसतात. तर शिळ्या माशाचे डोळे हे आत गेलेले व त्याला कधी पिवळसर तर कधी लालसर रंग आलेला असतो.
माशाचे कल्ले- माशाच्या तोंडाच्या खाली जो भाग असतो तो उचलून पाहिला की त्यात लाल रंगाचे कल्ले असतात. ते कल्ले फ्रेश लालसर दिसत असतील त्यावर हलकं रक्त असेल तर तो मासा ताजा असतो. जर ते गुलाबी रंगाचे किंवा फिकट लाल रंगाचे असतील तर तो मासा शिळा असतो.
माशाचा वास – ताज्या माशांना उग्र किंवा घाण वास येत नाही. त्यांना समुद्राच्या पाण्याचा किंवा नदीच्या पाण्याचा नैसर्गिक स्वच्छ वास असतो. जर माशाचा खूप उग्र, कुजलेला वास येत असेल, तर तो मासा खराब झालेला असतो.
त्वचा आणि खवले – माशाची त्वचा चमकदार आणि धातूसारखी चकाकणारी असावी. खवले शरीराला घट्ट चिकटलेले असावेत. शिळ्या माशांची त्वचा निस्तेज (dull) दिसते आणि त्याचे खवले सहज हाताला लागताच गळू लागतात
शेपटी आणि शरीर – ताजा मासा हातात धरल्यावर तो ताठ राहतो, बिलबिलीत लागत नाही. जर मासा हातात घेतल्यावर त्याची शेपटी किंवा शरीर लोंबकळत असेल, तर तो बराच वेळ बर्फात किंवा बाहेर ठेवलेला असू शकतो.



























































