
श्रीलंकेने पकडलेल्या 30 हिंदुस्थानी मच्छीमारांची सुटका करण्यात आली असून हे सर्व जण हिंदुस्थानात परतले आहेत, अशी माहिती श्रीलंका येथील भारतीय उच्चायोगाने दिली आहे. उच्चायोगाने याचा फोटोही शेअर केला आहे. याआधी मार्चमध्ये श्रीलंकेच्या ताब्यातील 14 मच्छीमारांना मायदेशी पाठवण्यात आले होते. हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील समुद्र हद्दीवरून बऱ्याचदा मच्छीमारांना सीमा ओलांडल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले जाते.




























































