
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विक्रोळी टागोरनगर ग्रुप नं. 3 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पुरुष आणि महिला गटासाठी आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे.
शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडांगणाचा शुभारंभ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वजीत ढोलम, सोनमळे, परम यादव, शेखर जाधव, श्वेता पावसकर, विश्वास शिंदे, सुनीता जाधव, रश्मी पहुडकर, सिद्धी जाधव, रवी महाडिक, अनंत पाताडे, वंदना बेंद्रे, मामी मंचेकर, शंकर ढमाले, बाबू शिंदे, सचिन मदने, अभय राणे, प्रकाश पुजारी, धर्मराज पंत, तानाजी मोरे, शालिनी चौहान आदी उपस्थित होते.



























































