आशा भोसले यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्वीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरांची राणी आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग आणि थकवा यामुळे प्रकृती अचानक खालावल्याने ११ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांच्यावर रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींनी एक्स (X) वर पोस्ट करत लिहिले, “आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल केल्याचे ऐकून मला खूप काळजी वाटत आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करतो.”