अल्पवयीन मुलीने घेतला पोलीस अधिकाऱ्याचा चावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीने पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेतल्याची धक्कादायक घटना भिवंडी पोलीस ठाण्यात घडली आहे. अल्पवयीन मुलगी आणि तिचे कुटुंब पोलीस ठाण्यात गेले असता तिच्या वडिलांनी डोके आपटण्यास सुरुवात केली. त्यांना थांबवायला पोलीस गेले असता मुलीने चावा घेतला.

शांतीनगर पोलीस ठाण्यात सईद खान, जब्बो खान, मौसीम खान आणि अल्पवयीन मुलगी हे शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. काही वेळानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सईद खान हे पोलीस ठाण्याच्या आवारातील खांबावर डोके आपटत होते. त्यांना अडवण्यासाठी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप गेले असता अल्पवयीन मुलीने त्यांच्या हाताला चावा घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.