नितीशकुमार आज देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये सत्तांतरणाच्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे उद्या मंगळवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 एप्रिल रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बिहारच्या मंत्रिमंडळाची बैठक 14 एप्रिल रोजी बैठक होईल. मुख्यमंत्री म्हणून ही त्यांची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असेल. त्यानंतर दुपारी 2 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान हे बैठकीला निरिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 चाजता एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सराओगी यांनी दिली. या बैठकीत नितीश कुमार हे नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील.