ऑस्ट्रेलियात लष्कराची धुरा महिलेच्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच एका महिलेला लष्करप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. लेफ्टनंट जनरल सुसान कॉयल जुलैपासून ही जबाबदारी सांभाळतील. लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

55 वर्षीय कॉयल या 1987 मध्ये सैन्यात दाखल झाल्या होत्या. आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सैन्यदलात सध्या महिलांचा सहभाग सुमारे 21 टक्के आहे आणि 2030 पर्यंत तो 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितले की, 125 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला लष्करप्रमुख बनवले जात आहे.