केजरीवाल म्हणाले मोदी सरकारची उलटी गिनती सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेत मतदारसंघ फेररचाना विधेयक फेल ठरले. हा नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराचा पराभव आहे. मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशी एक्स पोस्ट दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली.

हा लोकशाहीचा विजय

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, हा आपली लोकशाही आणि देशाच्या एकतेचा मोठा विजय आहे. हा राज्यघटनेवरील हल्ला होता तो आम्ही हाणून पाडला. ही एक चांगली गोष्ट आहे.

23 एप्रिलला दिल्लीच्या अहंकाराचा पराभव करणार

विधेयक नामंजूर झाल्यानंतर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तामीळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आम्ही 23 एप्रिलला दिल्लीचा अहंकार आणि त्या अहंकाराचे समर्थन करणाऱ्या गुलामांचा पराभव करणार, असे स्टॅलिन म्हणाले.