ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा महाभियोग आणण्याची विरोधकांची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्यासाठी विरोधी पक्षांनी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुन्हा एकदा महाभियोग प्रस्ताव दाखल करण्याची तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांमधील ज्येष्ठ नेते नोटीशीचा मसुदा तयार करण्यासाठी कामाला लागले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेत महिला आरक्षण लागू करण्यासाठी मांडलेली घटनादुरुस्ती विरोधकांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे.

काही दिवसांपूर्वीच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी फेटाळला होता. विरोधी पक्षांच्या 193 खासदारांच्या या प्रस्तावावर स्वाक्षऱया होत्या. यावेळी 200 खासदारांचे समर्थन मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष धूमधडाक्यात साजरे केले जात असून त्यानिमित्ताने मुंबईत विविध कार्यक्रम सुरू आहेत. याच अंतर्गत शिवसेना शाखा क्र. 131 च्या वतीने विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार घाटकोपर रेल्वे स्थानक (पूर्व) तसेच सहकार मार्पेट येथे सदस्य नोंदणी व नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे. नुकताच याचा शुभारंभ झाला. यावेळी उपविभागप्रमुख अजित गुजर, विधानसभा प्रमुख प्रकाश वाणी, संघटक प्रसाद कामतेकर, शाखाप्रमुख विशाल चावक, शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, राजेश खरात, रमेश सावंत, वसंत पाटील, कमलेश रजपूत, दिनकर मांडले, शांताराम निकम, संदीप मयेकर, अरुण चव्हाण, श्रीहरी मळेकर, सीताराम तळवडेकर, सौरभ पारकर, स्वप्नील म्हात्रे, प्रथमेश गुप्ता, महिला आघाडीच्या नीलम कदम, अॅड. वृषाली चावक आदी उपस्थित होते.