
– फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवले की ते काळ पडते. त्याच्या चपात्याही कडक किंवा वातड होतात. असे होऊ नये म्हणून पीठ मळताना पाण्यासोबत दोन ते तीन चमचे दूध घाला. पीठ नेहमी जास्त वेळा मळा. पोळ्या छान होतात.
– पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. पीठ मळून झाल्यावर त्यांच्या वरच्या भागाला थोडे तेल किंवा तूप लावा. पीठ उघडे ठेवू नका. काचेच्या किंवा एअर टाईट डब्यात ठेवा. डब्याचे झाकट घट्ट लावल्याने पिठाचा ओलावा टिकून राहतो.




























































