
कडक उन्हामुळे उकाडा वाढला की कुलर, एसी आणि पंख्यासारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परिणामी लाईट बिलदेखील अवाचे सवा येते आणि खिसा रिकामा होतो.
एसी नेहमी 24 ते 26 डिग्री सेल्सिअसवर सेट करा.
एसीसोबत कमी गतीने पंखा लावल्यास थंड हवा खोलीत लवकर पसरते. जुन्या पंख्यांच्या जागी ब्रुसेल्स डायरेक्ट करंट पंखे वापरा.
फ्रीजचा दरवाजा सतत उघडू नका.
गिझरचे बटण जास्त वेळ सुरू ठेवू नका.
लॅपटॉप, मोबाईलचे चार्जर प्लगमधून बाहेर काढून ठेवा.
एलईडी बल्ब किंवा ट्यूबलाईट वापरा.
या सर्व सोप्या टिप्स वापरल्या तर वीज कमी खर्च होऊन बिलही कमी येते.






























































