धनुप्पा साळगावकर यांचे निधन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनुप्पा साळगावकर (83) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन स्नुषा आणि तीन नाती असा परिवार आहे. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस व शिवसेना वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख राम साळगावकर यांचे ते वडील होत. धनुप्पा साळगावकर यांच्या निधनामुळे गिरणगावातील एक सामाजिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते – आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, प्रभाग समिती अध्यक्ष पद्मजा चेंबूरकर, नगरसेविका अबोली खाडे, नगरसेवक विजय भणगे, विधानसभा संघटक निरंजन नलावडे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.