
>> अमोल भारसाकळे
‘अंगा लावूनियां राख।
डोळे झांपुनी करिती पाप,
दावुनि वैराग्याची कळा।
भोगी विषयांचा सोहळा!
तुका म्हणे सांगों किती।
जळो तयांसी संगती’
संत तुकाराम महाराजांनी अनेक वर्षांआधीच आपल्याला त्यांच्या ओवीतून भोंदूबाबांपासून सावध राहण्यासाठी संदेश दिला होता. हे राज्य ज्ञानोबा, तुकोबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचे आहे, पण इथे गेल्या काही वर्षांत धर्माचा बाजार बसवून अनेक भोंदूबाबांनी आपली दुकानदारी प्रत्येक जिह्यात थाटलेली आपल्याला दिसून येईल. प्रवचनाच्या नावावर अनेकांचा भावनिक फायदा घेऊन स्त्रियांना भोंदूबाबांनी फसवल्याचे अनेकदा सिद्ध झालेलं आपण बघितलं आहे.
प्रत्येक पुटुंबात अडचणी येतात, संकटं येतात, पण त्यावर उपाय म्हणून आपण कोणाकडे जातो हे बघण्याची खरी गरज आज आहे, कारण आज सगळीकडे दुकानदारी लावून बसलेले भोंदूबाबा आहेत, ज्याच्याकडे ना विज्ञान, ना तर्प ना शिक्षण. फक्त गोड बोलणं आणि खोट्या आश्वासनांचा बाजार असतो. त्याला अशा भावनिक आणि अगतिक स्त्रिया बळी पडतात, कारण त्यांच्यामध्ये खूप मोठय़ा प्रमाणात भविष्यात काय होईल, कसं होईल याची भीती असते व त्यात भर म्हणजे अज्ञान आणि झटपट उपायांची अपेक्षा असल्यामुळे अनेक जण भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकतात.
खरं बघायला गेलं तर, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक बारीकशी रेघ आहे, तो फरक ओळखून वागले पाहिजे. कारण तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद कोणत्याही भोंदूबाबाकडे नाही. ती तुमच्यातच आहे.
स्त्रिया अनेकदा वैयक्तिक, कौटुंबिक आणि मानसिक समस्यांमुळे भोंदूबाबांच्या किंवा स्वयंघोषित महाराजांच्या जाळ्यात अडकवल्या जातात, यामागे मानसिक, सामाजिक आणि भावनिक कारणे असतात.
मानसिक असुरक्षितता आणि नैराश्य, अनेकदा मुलं न होणे, यामुळे पुटुंबातील कलह, आर्थिक समस्या. यामुळे महिला मानसिकदृष्टय़ा कमपुवत होतात. अशा वेळी त्यांना मानसिक आधाराची गरज असते. त्याचा गैरफायदा भोंदू व स्वयंघोषित बाबा घेतात. त्यांच्या भावनिक कमपुवतपणाचा फायदा घेतात. ते आपल्या बोलण्यातून, संमोहनाद्वारे महिलांचा विश्वास संपादन करतात. दैवी शक्ती असल्याचा दावा करून हे बाबा महिलांना भुलवतात व त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करतात.
संस्कार आणि संस्पृतीचा टेंभा मिरवत भोळ्याभाबळ्या जनतेच्या विश्वासाचा, त्यांच्या भक्तीचा बाजार मांडणारे अनेक बुवा, बाबा, महाराज आपल्या पुकर्माने प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं हे राज्य साधूसंतांचं असताना अशा निर्लज्ज आणि नालायक लोकांचा उदय होतोच कसा आणि झालाच तर राजकर्ते, समाज अशांना थारा देतोच का? जे भोंदूबाबा, स्वयंघोषित महाराज आज जेलमध्ये आहेत. त्यांचा भांडाफोड करणारे समाजद्रोही ठरवले जात आहेत. हे का होतंय याचा विचार करायची खरी वेळ येऊन ठेपली आहे, त्यामुळे विचार नक्कीच करावा लागेल. नाही तर खूप उशीर होईल. समाज प्रश्न विचारण्यापेक्षा ‘श्रद्धा’ या नावाखाली पुठल्याही ऐऱ्यागैऱ्या भोंदूबाबाला शरण जातोय हे समाजाच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. दोष फक्त भोंदूबाबांना देऊन चालणार नाही, समाजानेही वैचारिक बदल स्वीकारायला हवा व स्वतःला प्रश्न विचारायला हवेत.


























































