
पुण्यभूषण फाऊंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणाऱया ‘पुण्यभूषण’ पुरस्काराचे वितरण पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 9 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. फोर्स मोटर्स आणि श्री फिरोदिया ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी, डॉ. रघुनाथ माशेलकर, महापौर मंजुषा नागपुरे, पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई हे उपस्थित असतील. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली म्हणून ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हा कार्यक्रम होणार असून जायबंदी सैनिकांचा गौरव केला जाणार आहे. फ्लाईंग ऑफिसर वैभव भागवत यांच्या आई लता भागवत या जायबंदी सैनिकांच्या वतीने मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश देसाई हे करणार असून सूत्रसंचालन डॉ. समिरा गुजर-जोशी करतील.


























































