कोलकाता येथील स्फोटातील दोन संशयितांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर  बेहरामपूर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांना मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने अटक केली. रॉकी खान ऊर्फ अधिक खान आणि शाहदत्त सौराब सरकार अशी त्या दोघांची नावे असून त्यांना पुढील कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन कsले.

कोलकाताच्या बेहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक किराणा दुकान आहे. त्याच परिसरात एक आश्रम आणि देवीचे मंदिर आहे. 12 मे रोजी काही अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. त्यानी इलेक्टिक पोलवर लावलेले पोस्टर काढले. दुसऱया दिवशी पुन्हा काही तरुण तिथे आले. त्यानी तीन सॉकेट बॉम्ब फेकून पळ काढला. तीनपैकी दोन बॉम्बचा स्पह्ट झाला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर तेथे एक सॉकेट आढळून आले.

बॉम्बस्फोटाच्या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही तरुण तेथे आले. त्यांनीदेखील एकाला धमकी दिली. घडल्या प्रकरणी बेहरामपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

या गुह्याच्या तपासादरम्यान काहीजणांना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान रॉकी आणि शाहदत्तचे नाव समोर आले. ते दोघे कोलकाता येथून मुंबईला पळून गेल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग आणि युनिट 5 च्या पथकाने संयुक्त कारवाई सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांनी त्या दोघांना बोरिवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यानी बॉम्बस्फोटातील सहभागाची कबुली दिली. त्या दोघांना ट्रान्झिट रिमांडवर कोलकाता येथे नेण्यात आले.