
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा आता 20 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने मुंबईच्या पाणीपुरवठय़ाची मदार आता राज्य सरकारकडून मिळणाऱ्या राखीव जलसाठय़ावर राहणार आहे. अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे मुंबईचा ऑगस्टपर्यंतच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मिटला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठय़ात घट झाल्याने उन्हाळ्यातील पाणीपुरवठय़ाच्या नियोजनासाठी मुंबईत 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.





























































