
आपल्या अभिनयानं आणि गोड हसण्यानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री कृती खरबंदा नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. तीने बॉलिवुडसोबत साउथ इंडस्ट्रीमध्येही नाव कमवले आहे. कृतीने नुकतेच सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तीने चॉकलेटी रंगाचे ऑफ शोल्डर टॉप आणि स्लिट स्कर्ट घातला आहे. यावर तीने फ्रीझी हेअरसह अगदी साधा नो मेकअप लूक केला आहे. कृती या स्टर्निंग लूकमध्ये सुंदर दिसत आहे. या फोटोंसोबत कृतीने ‘ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

































































