Chandrapur News – बल्लारपूर रेल्वेमार्गावर एका बिबट्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-जोगापूरच्या जंगल परिसरात विरुर स्थानकावरून बल्लारशाकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मध्य चांदा वनविभागाच्या हद्दीत घडलेली ही घटना केवळ एका वन्यप्राण्यापूरती मर्यादित नसून, जंगलातून वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या आणि वन्यजीव सुरक्षेबाबत सरकारी उदासीनतेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशा घटनांनंतरही जबाबदार यंत्रणा केवळ पंचनामे आणि चोकशीपुरतीच मर्यादित राहणार का, की वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कृती आराखडा तयार होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.