आजपासून ‘नवतपा’! 2 जूनपर्यंत तीव्र उष्णतेचे चटके बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी हंगामातील सर्वात उष्ण दिवसांचा कालावधी मानल्या जाणाऱ्या ‘नवतपा’ची सुरुवात सोमवारपासून होणार आहे. सूर्य ‘रोहिणी’ नक्षत्रात प्रवेश करणार असल्यामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडणार आहेत. या काळात म्हणजेच पुढचे नऊ दिवस, 2 जूनपर्यंत तीव्र उष्णतेचे चटके बसणार आहेत. राज्यातील अनेक भागांचा पारा 45 ते 47 अंशांच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

राज्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. ब्रह्मपुरी येथे रविवारी सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रविवारी अमरावती 45.2, चंद्रपूर 45.6, वर्धा 45.5, नागपूर 4 5.4, गडचिरोली 4 5.3, गोंदिया 4 5, भंडारा 44.8, यवतमाळ 42.8, बुलढाणा 40.6, अकोला 43.4 अंश सेल्सियसची नोंद झाली.

मुंबईचा पारा 35 अंशांवर
मुंबईत मागील दोन दिवस 35 अंशांच्या आसपास कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारी सकाळी काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्यामुळे तेथील तापमानात घट झाली. मात्र पुढील आठवडाभर शहराचे कमाल तापमान 34 ते 35 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.