
>> अरुण
मुंबईतल्या आमच्या घरालगत देशातली 1853 मध्ये सुरू झालेली ट्रेन आधुनिक रूपात अव्याहत धावत असते. या ट्रेनखालचे हे ‘ब्राडगेज’ अंतराचे रूळद्वय अनेकदा बदलले गेले असले तरी ट्राक म्हणजे मार्ग 1853 मध्ये होता तोच आहे. इंग्लंडमध्ये प्रवासी रेल्वे 1825 मध्ये सुरू झाली, तर हिंदुस्थानात 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी रेल्वे आगगाडी धावली. त्याकाळी (आणि नंतरही सुमारे 100 वर्षे) दगडी कोळशाच्या वाफेवर चालणारी अजस्र इंजिनं आम्ही बालपणापासून पाहत आलो. देशात अशी प्रवासी रेल्वे आणण्याचा ध्यास आपले मराठी, दानशूर, समाजहितैषी असलेले जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे यांनी घेतला होता. देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या समितीवरही ते होते. एवढेच नव्हे तर ठाकूरद्वारच्या त्यांच्या हवेलीतच ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे तथा जीआयपी (आर) रेल्वे कंपनीचं कार्यालय होतं असं सांगितले नाते.
1825 मध्ये इंग्लंडमध्ये स्टाकटन-डार्लिंगटन रेल्वे सेवा सुरू झाली तेव्हा दोन रूळातलं अंतर 4 फूट 8 इंच होतं. त्यानंतर 1830 मध्ये लिव्हरफूल-मान्चेस्टर लाइन कार्यान्वित झाली तेव्हा हे अंतर 4 फूट साडेआठ इंच (1435 मिलिमीटर) करण्यात आले आणि त्याला ‘स्टाण्डर्ड गेज’ म्हटलं गेलं. नंतरच्या काळात त्यामध्ये ट्रेनला स्थैर्य येण्यासाठी आयझेम्बर्ड ब्रुनेल यांनी 7 फुटांचं ‘ब्राड गेज’ अंतर ठरवलं. नंतर त्यात 1/4 इंचाने सुधारणा होऊन आताचं 2140 मिलिमीटरचं ‘ब्राड गेज’ सर्वमान्य झालं.
4 फुटांच्या स्टाण्डर्ड गेज रेल्वे रूळांना ‘नारो गेज’सुद्धा म्हटलं जायचं. त्याशिवाय काही देशांत दोन रूळांमध्ये 5 फूट अंतर असलेलेही रूळ टाकण्यात आले. शेवटी ‘ग्रेट वेस्टर्न (युरोपीय) रेल्वे’चं ‘ब्राड गेज’ अंतरच बहुतेकांनी स्वीकारलं. याशिवाय 3 फुटांचं गेज (914 मिमी.), मीटर गेज (1000 मि.मी.), केप गेज (10,67 मि.मी.), स्टाण्डर्ड गेज (1435 मि.मी.), रशियन गेज (1520 मि.मी.), पाच फुटी गेज (1524 मि.मी.), आयरिश गेज (1600 मि.मी.), आयबेटियन गेज (1668 मि.मी.) आणि इंडियन गेज (1676 मि.मी.) व मीडियम गेज असे रेल्वे रूळांच्या ‘गेज’ (अंतराचे) प्रकार आहेत. 3 फूट 6 इंचाचे ‘गेज’ असल्यास त्याला ‘केप गेज’ म्हटलं जातं.
आपल्या देशात आता सर्वत्र साडेपाच फूट रूंदीचे (1676 मि.मी.) रेल्वे ट्राक असतात, तर मेट्रोसाठी 1435 मि.मी. ‘गेज’चे स्टाण्डर्ड ट्राक वापरतात. माथेरानच्या प्रसिद्ध रेल्वेचा ट्राक केवळ 2 फूट रूंदीचा असून हा मार्ग 21 किलोमीटर ‘टाय ट्रेन’चा आहे. तो 1901 मध्ये तो पिरभाय यांनी सुरू केला.




























































