
भाजपने खेळ सोडून राजकारणाकडे लक्ष केंद्रीत करावे. भाजपने खेळ सोडल्यास आपणही राजकारण सोडणार असल्याने सांगत हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भाजपला चांगलेच फटकारले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख संजय सिंह यांच्याबाबत फोगटने विधान केले आहे. ती म्हणाली की, संजय सिंग बेशिस्तीबद्दल बोलत आहेत, पण अशा लोकांना प्रत्युत्तर देणे गरजेचे नाही, असे ती म्हणाली.
अनेक लोकांना वाटते की मी राजीनामा द्यावा, पण मी देणार नाही. मी समाजासाठी आणि लोकांसाठी लढेन. आम्ही मैदानातून पळून जाणारे नाही, तर शौर्याने लढणारे आहोत, असेही तिने सांगितले. विनेश फोगाट म्हणाली की, भाजपवाल्यांनी खेळ सोडून राजकारणाकडे लक्ष द्यावे. ते खेळाच्या क्षेत्रात का येत आहेत? असा सावलही तिने केला. ज्या दिवशी राजकारणी खेळ सोडतील, त्या दिवशी मी सुद्धा राजकारण सोडून खेळात येईन, असे तिने स्पष्ट केले.
देशभरात महागाई सातत्याने वाढत आहे आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढत आहेत. भविष्यात किमती आणखी वाढू शकतात. ‘कॉक्रोच पार्टीबद्दल विनेश म्हणाल्या की, जो पक्ष शेतकरी आणि मजुरांचा आवाज उठवतो, आम्ही त्याच्यासोबत उभे आहोत. काँग्रेस पक्ष जनतेचा आवाज उठवणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. काँग्रेस पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहे. आम्ही लढणारे आहोत, पळणारे नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.
























































