
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै 2026 मध्ये होणाऱया 10 वी आणि 12 वीच्या फेरपरीक्षांचे हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे हे हॉल तिकीट आता विद्यार्थ्यांना मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करता येईल.
हॉल तिकीट डाऊनलोड करताना शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी तात्काळ संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भातील सूचनांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉल तिकीट प्रिंट काढून देणे बंधनकारक आहे. त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्याचा शिक्का व स्वाक्षरी उमटवून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहे. शुल्क आकारणीस सक्त मनाई आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र प्रिंट करताना शाळा किंवा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.



























































