
इराणला आर्थिक मदत पाठवल्यामुळे सौदी अरबमधील दोन हिंदुस्थानी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद राहीब हसन आणि मोहम्मद जाफर हसन असे अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते मूळचे उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवाशी आहेत. यातील एकाने दूतावासाच्या खात्यावर 200 रियाल म्हणजेच 5 हजार रुपये पाठवले होते. त्यावरून सौदीने त्यांना अटक केली आहे, असे त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.



























































