
सोशल मीडियावर सहज व्यक्त होता येते याचा अर्थ असा होत नाही की, कोणाचीही त्यावर बदनामी करावी, असा सज्जड उच्च न्यायालयाने दिला आहे.
अभिनेता सलमान खानबाबत त्याचा शेजारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने करत होता. त्यावर न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सेलिब्रेटी असो अथवा सामान्य व्यक्ती त्याची बदनामी सोशल मीडियावर होता कामा नये. त्यामुळे सलमानचे शेजारी केतन ककड यांनी त्याची सोशल मीडियावर बदनामी करू नये. सलमानसंदर्भात असलेले व्हिडीओज् डिलीट करावेत, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ककड यांनी सलमानसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केले होते. असे व्हिडीओ प्रसारित करून काहीही साध्य होणार नाही. अशा कृतीमुळे न्यायालयाचा वेळही वाया जातो, असेही न्यायालयाने फटकारले.


























































