
जालना जिल्ह्यातील अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गुरूवारी 11 जून रोजी दुपारच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाण करणाऱ्या अंबड तालुक्यातील राहुवाडी तांडा येथील 15 जणांच्या विरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalana News- अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी pic.twitter.com/9k6NDQBSdf
— Saamana Online (@SaamanaOnline) June 12, 2026
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील राहुवाडी तांडा गावातील फिर्यादी तसेच आरोपी व साक्षीदार यांचे आपापसांत वाद झाले होते. ते वाद मिटवण्यासाठी फिर्यादी व साक्षीदार आरोपीतांना समजावण्यास गेले होते, आरोपींनी बेकायदेशीर लोकांना जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर हातामध्ये दगड घेवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. म्हणून फिर्यादी – संपत लक्ष्मण राठोड (वय 50) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास कामी पोलीस निरीक्षक संतोष घोडकेयांच्या आदेशाने तोडकर यांच्याकडे दिला आहे.
रुग्णालयासारख्या पवित्र आणि सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारची हिंसक घटना घडल्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आरोपींची नावे
1) मोहन साहेबराव राठोड २) प्रकाश अर्जुन राठोड ३) युवराज कन्नु राठोड ४) संतोष कन्नु राठोड ५) रामेश्वर अर्जुन राठोड ६) विठ्ठल कन्नु राठोड ७) किरण युवराज राठोड ८) करण संतोष राठोड ९) अर्जुन किसन राठोड १०) राजकुमार संतोष राठोड ११) सतिष साहेबराव राठोड १२) शांतीलाल गोरख राठोड १३) राहुल गोरख राठोड १४) संपत नानु राठोड १५) पवन संतोष पवार सर्व रा. राहुवाडी तांडा ता अंबड



























































