
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिक, युवासैनिकांनी मोठ्या संख्येने राज्यभरातून हजेरी लावली होती. त्याच बरोबर शिवसेना नेते, आमदार, खासदार आणि नगरसेवक सुद्धा लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)































































