
मुंबईतील मुंबईतील वांद्रे येथे मेट्रो मार्ग 2-बी (Metro Line 2B) च्या निर्माणाधीन प्रकल्पाच्या ठिकाणी सोमवारी रात्री आग लागली. आगीमुळे य मार्गावर मंगळवारी पहाटेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. रात्री 10.52 च्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, वांद्रे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन कामाच्या ठिकाणी सोमवारी रात्री आग लागली. चौथ्या स्तरावरील ‘पायलॉन 4’ वरील ‘पिलर पी-400’ (P-400) जवळ आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




























































