ट्रेंड – मोठ्या पगाराची नोकरी सोडून कॅब ड्रायव्हर बनला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही लोक फक्त पगार मिळतोय म्हणून नोकरी करतात. अशातच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्यक्तीने चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि आता कॅब ड्रायव्हर म्हणून काम करतोय. तो म्हणतोय, ड्रायव्हरचे काम हे कॉर्पोरेट नोकरीपेक्षा खूप चांगले आहे. हा व्हिडीओ कंटेंट क्रिएटर चेतना सिंह हिने chetnasingh___ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हैदराबादमधील कुमार नावाच्या व्यक्तीला त्याच्या करीअरबद्दल विचारले. त्या वेळी त्याने कॉर्पोरेट नोकरी कंटाळवाणी वाटायची म्हणून सोडल्याचे सांगितले. ड्रायव्हिंगच्या कामात त्याला कुठल्याची प्रकारचा मानसिक ताण जाणवत नाही. शिवाय विविध राज्यांतील लोकांना भेटता येते, त्यांचे अनुभव जाणून घेता येतात. व्हिडीओ पाहून नेटकरी ड्रायव्हरचे भरभरून कौतुक करत आहेत.