असं झालं तर… तुमचे टपाल पोहोचले नाही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण अनेकदा पोस्ट सेवेच्या माध्यमातून स्पीड पोस्ट, पार्सल, पत्र वगैरे पाठवत असतो. मात्र काही वेळेला वेळेवर आपले टपाल पोहोचत नाही.

टपाल वेळेवर न मिळाल्यास घाबरून न जाता लगेच कार्यवाही करा. तुमच्याकडे ट्रॅकिंग नंबर असेल तर तो इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर टाकून स्थिती तपासा.  

तुमच्या पाकिटावरील किंवा पावतीवरील 13 अंकी नंबर वापरून इंडिया पोस्ट ट्रॅकिंग पेजवर पार्सल किंवा स्पीड पोस्टची सद्यस्थिती तपासा.

तुम्ही इंडिया पोस्टच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा ई-मेलद्वारे मदत घेऊ शकता. टपालला उशीर झाल्यास इंडिया पोस्ट तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार नोंदवा.

तुमच्या परिसरातील मुख्य किंवा स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱयांना ‘पोस्टिंग पावती’ किंवा ट्रॅकिंग तपशील दाखवून विचारणा करा.