… पिक्चर अभी बाकी हैं! रोनाल्डोने टीकाकारांना अपयशानंतर दिले चोख उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cristiano-ronaldo-shuts-down-critics-after-congo-draw-portugal-world-cup-updates (2)

पोर्तुगालचा दिग्गज रोनाल्डो सहा विश्वचषकांमध्ये सहभागी होणारा मेस्सीनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पण रोनाल्डोला मेस्सीसारखी दिमाखदार सुरुवात करता आली नाही. कोंगोसारखा नवखा देश समोर असताना रोनाल्डोला एकही गोल करता आला नाही, हे त्याचे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे. या अपयशानंतर रोनाल्डोवर टीका झाली. पण रोनाल्डो शांत बसला नाही. त्याने आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

लिओनेल मेस्सी, किलियन एमबाप्पे आणि आर्ंलग हालंड यांनी आपल्या सलामीच्या सामन्यांमध्ये गोल करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण रोनाल्डोला गोलच करता आला नाही आणि पोर्तुगालच्या दिग्गज संघाला कोंगोसारख्या संघाबरोबर बरोबरीत समाधान मानावे लागले, हे त्यांच्यासाठी पराभवासारखेच आहे. त्यानंतर रोनाल्डोवर जोरदार टीका झाली आहे. रोनाल्डो चांगल्या फॉर्मात दिसत नसल्याचेही म्हटले जात आहे.

रोनाल्डो म्हणाला की, ‘आम्हाला जी अपेक्षा होती तशी सुरुवात आम्ही करू शकलो नाही हे सत्य आहे. पण अजून वर्ल्ड कप संपलेला नाही. आमच्या पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही हा उत्साह टिकवून ठेवा.’

पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांना विचारण्यात आले की, त्यांनी रोनाल्डोला सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमधून वगळण्याचा विचार केला होता का. मार्टिनेझ म्हणाले, ‘जेव्हा तुम्हाला गोल सर्वाधिक गरज असते तेव्हा जगातील सर्वोत्तम गोल करणाऱया खेळाडूला वगळणे शहाणपणाचे नाही. ख्रिस्तियानोचा अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.’