
‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. मोहमद जुनैद नावाच्या एका स्वयंसेवकाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यूस आणि खाऊचे पाकीट वाटून मदत केली. यावेळी अभिजीत दीपके यांनी जुनैद यांची गळाभेट घेतली आणि कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे पाय स्पर्श करत आभार मानले. दरम्यान, दीपके यांनी जंतर-मंतरवरील स्वच्छतागृहांचा पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे.


























































