
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य पुस्तक पेढी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपक्रमाचा शानदार शुभारंभ शिवसेना भवन येथे पार पडला.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्यासाठी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दक्षिण-मध्य मुंबईतील पहिली ते बारावीपर्यंतच्या एक हजार गरजू विद्यार्थ्यांसाठी हा पुस्तक पेढी उपक्रम सुरू झाला आहे. दप्तरांचे वाटपही करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, विभागप्रमुख, आमदार महेश सावंत, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, नगरसेविका विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव, विभाग संघटिका पद्मावती शिंदे, नगरसेवक मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे व सुप्रदा फातर्पेकर, उपसचिव प्रवीण महाले उपस्थित होते.
























































