दिल्ली हादरली! 11 वर्षीय मुलीचे अपहरण; अत्याचार करून केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांत विविध भागांतून समोर येणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश सुन्न झाला आहे. सद्यस्थितीत आणि वाढत्या घटनांमुळे आजच्या काळात अल्पवयीन मुलींना घर, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणीही सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच दिल्लीतील मेहरौली भागात एक धक्कादायक समोर आली आहे. एका 11 वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 11 वर्षाच्या मुलीचे फुटपाशवरून अपहरण केले. यानंतर तिला गुरुग्राममधील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास पोलिसांना एका मुलीचे अपहरण झाल्याचा कॉल आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अखेर संशयित आरोपीचा छडा लावून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने मेहरौली येथील फुटपाथवरून मुलीचे अपहरण केल्याचे मान्य केले. आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.