आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या संघात बदल; यस्तिका भाटियाला वगळले, जी. कमलिनीची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपान येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेसाठी हिंदुस्थानने यस्तिका भाटियाला वगळून जी. कमलिनीची राखीव यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. सध्या सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकातून साखळीतच बाहेर पडलेल्या संघाच्या तुलनेत हा एकमेव मोठा बदल आहे. अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीलची निवड फिटनेसवर अवलंबून असेल, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान घोटय़ाच्या लिगामेंटला दुखापत झाल्यामुळे पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर पडली होती. श्रेयंका पाटीलच्या जागी संघात आलेली आणि विश्वचषकात एक सामना खेळलेली लेगस्पिनर प्रेमा रावतची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात निवड झालेली नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनि (यष्टिरक्षक), भारती फुलमाळी, श्री चरणी, रेणुका सिंग, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा यादव, नंदनी शर्मा.