माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिह्यातील माणगाव तालुका क्रीडा संकुलाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात येणार असून, माणगाव येथे अत्याधुनिक सुविधा असलेले उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. तालुका क्रीडा संकुलासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी 2 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या कामाला गती देण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.