सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सफाई कर्मचाऱ्याच्या पुनर्वसनासाठी 46 सेवा निवास वसाहतींपैकी 30 वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी 23 ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. उर्वरित सात ठिकाणी रहिवाशांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.