
व्हॉट्सअॅपने नव्या युजरनेम फीचरची घोषणा करताच हे फीचर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर कोणाशीही संवाद साधण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर देण्याची गरज उरणार नसल्याने ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर गुन्हेगारी वाढू शकते, असे केंद्र सरकारने सांगत या नव्या फीचरची चौकशी करण्याचे म्हटले आहे. व्हॉट्सअॅपने युजरनेम फीचर या वर्षीच्या अखेरपर्यंत अधिकृतपणे रोलआऊट करण्याची घोषणा केली होती.























































