घोडबंदर रोडवर टेम्पो पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर धावता टेम्पो अचानक पेटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. या घटनेमुळे घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली होती.

घोडबंदर रोडवरून चालक शहा फिरोज खान हा ब्रास नट-बोल्टचा माल घेऊन जात होता. त्याचवेळी टेम्पोला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यामुळे वाहतूक काही काळ वाघबीळ पुलाखालून वळवण्यात आली होती. हायड्रा क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या बाजूला करण्यात आला.