
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची या गुरुवारी हिंदुस्थानी दौऱ्यावर आल्या आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा या स्वागत समारंभाला उपस्थित होते. ताकाइची या हिंदुस्थान-जपान 16 व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील.


























































