
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर परिसरात शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या गेट क्रमांक 4 बी वर तैनात असलेल्या प्रांतीय सशस्त्र दल (पीएसी) जवानाच्या अधिकृत बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने तिघे जण किरकोळ जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जवान ड्युटीवर असताना त्याच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली. गोळी थेट कोणालाही लागली नाही, मात्र तिचे तुकडे उडाल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या तीन जणांना किरकोळ दुखापत झाली.
जखमी झालेल्या तिघांची ओळख निक्की गुप्ता, रामबाबू आणि विकास यादव अशी झाली असून ते मंदिर परिसरातील हार-फुलांचे दुकानदार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही गंभीर धोका नाही.
VIDEO | Varanasi: An accidental firing took place at the Kashi Vishwanath Temple’s Gate No. 4B, leaving three injured.
DCP (Kashi Zone) Gaurav Banswal says, “Two rounds were accidentally fired on the ground. The pellets struck three flower-sellers, one in the hand, one in the… pic.twitter.com/HH4ELXvDkM
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2026
घटनेनंतर मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुरक्षा दल आणि पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित जवानाकडून गोळी चुकून कशी सुटली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे देशातील अतिसुरक्षित धार्मिक स्थळांपैकी एक असल्याने या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.




























































