
अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी गुगलने आपली स्टोरेज पॉलिसी बदलण्याचे ठरवले आहे. फोनचा बॅकअप गुगल अकाऊंटवर ठेवल्यास जे फ्रीमध्ये 15 जीबी स्टोरेज मिळते ते आता लवकर भरणार आहे.
नव्या अपडेटेड पॉलिसीनुसार, आता फोनचे फोटो व्हिडीओच नव्हे तर आता एसएमएस, कॉल हिस्ट्री आणि ऍप डेटाचा बॅकअपदेखील याच 15 जीबी फ्रीमध्ये मोजले जाणार आहे. गुगल येत्या काही महिन्यांत युजर्ससाठी हळूहळू रोलआउट करेल. या नव्या पॉलिसीमध्ये जास्त स्टोरेज खर्च होईल. आतापर्यंत गुगल मोफत 15 जीबी क्लाउड स्टोरेजमध्ये फक्त गुगल फोटोजवर अपलोड केलेले इमेज, व्हिडीओ आणि एमएमएस डेटामध्ये समाविष्ट असलेले फोटो-व्हिडीओच मोजत असे. परंतु आता कॉलहीस्ट्रीचा समावेश होणार आहे.



























































