
फिफा विश्वचषकाचा नाद अनोख्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. विश्वचषकाचे उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपले आहेत. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने आठ देशांत होणार आहेत. हे सामने कधी आणि कुठे होणार आहेत, याचे वेळापत्रक आता समोर आले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले संघ
फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत आठ संघ पोहोचले आहेत. यामध्ये मोरोक्को, फ्रान्स, अर्जेंटिना, स्वित्झर्लंड, स्पेन, नॉर्वे, बेल्जियम आणि इंग्लंड यांचा समावेश आहे.
सामन्यांची उत्सुकता शिगेला
फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना बोस्टन येथे होईल. या फेरीतील सर्वात महत्त्वाचा सामना हा स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील समजला जात आहे, हा सामना 11 जुलैला होणार आहे. नॉर्वे विरुद्ध इंग्लंड असा या वर्ल्ड कपमधील तिसरा सामना असेल. या फेरीतील चौथा आणि अखेरचा सामना हा अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यात 12 जुलैला रंगणार आहे.

























































