जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंबईतील दोन नगरसेवकांचे पद रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंबईतील दोन नगरसेवकांचे पद रद्द झाले. अजित पवार गट, प्रभाग क्रमांक 170 च्या नगरसेविका बुशरा नदीम कप्तान मलिक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे, अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी आज महापालिकेच्या विशेष सभेत केली. तसेच प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्रदेखील अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे अजित पवार गट आणि एमआयएमला धक्का बसला असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या एक-एकने कमी झाली आहे.