गई भैस उघड्या चेंबरमध्ये चार तासांनंतर सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेजवळ महानगरपालिकेचा निष्काळजीपणा एका मुक्या जनावराच्या जीवावर बेतलेला असताना. उघड्या चेंबरमध्ये चक्क म्हैस पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तब्बल चार तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर म्हशीची सुखरूप सुटका करण्यात आली. नवघर पोलीस, अग्निशमन विभाग, स्थानिक प्राणीप्रेमी यांच्या प्रयत्नांतून म्हशीला बाहेर काढण्यात आले.

तपोवन शाळेजवळ भलेमोठे उघडे चेंबर आहे. या चेंबरमध्ये एक म्हैस पडली. हे चेंबर अरुंद व खोल असल्याने बचावकार्य करताना अनेक अडचणी आल्या. पोलीस, अग्निशमन विभाग आणि प्राणीप्रेमी यांच्या मदतीने दोर, यांत्रिक साधने आणि तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने म्हशीला बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नाने म्हशीला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग, नवघर पोलिसांनी बचाव मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.

काही अंतरावरच शाळा

या घटनेनंतर पालिकेच्या हलगर्जी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील गटारांवर झाकणे बसवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही अनेक ठिकाणी चेंबर उघडीच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून काही अंतरावरच तपोवन शाळा आहे. एखादा विद्यार्थी, नागरिक या उघड्या चेंबरमध्ये पडल्यास मोठी इजा होण्याची शक्यता आहे.