असं झालं तर…मालमत्तेतून बेदखल केले  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1. अनेक वेळा पालक आपल्या मालकीच्या मालमत्तेतून आपल्या मुलांना बेदखल करतात. त्यानंतर अशा मुलांचा त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क सांगता येत नाही.

2. मालमत्ता वडिलोपार्जित असल्यास बेदखल करता येत नाही. मात्र ती स्व-अर्जित (वडिलांनी स्वतः खरेदी केलेली) असेल तर अधिकार मर्यादित असतात.

3. स्व-अर्जित मालमत्तेत मुलांचा कोणताही कायदेशीर जन्मजात हक्क नसतो. तुम्ही मालमत्तेच्या संपादनात योगदान दिले असेल, तर न्यायालयात जाऊन हक्क मागू शकता.

4. जर पालकांनी स्व-अर्जित मालमत्ता दुसऱ्या कोणाच्या नावे मृत्युपत्राद्वारे केली असेल, तर बेदखल झालेल्या मुलाला न्यायालयात जावे लागेल.

5. वडिलोपार्जित मालमत्ता चार पिढ्या जुनी असणे गरजेचे आहे. कुटुंब विभक्त झाले असेल तर मालमत्ता वडिलोपार्जित मानली जात नाही.