
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांपैकी महत्त्वाचा अलेला तानसा तलाव बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता भरून वाहू लागला. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले आहेत. या तलावाची जलधारण क्षमता 14,508 कोटी लीटर इतकी आहे. तानसा धरण हे जगातील सर्वात लांबीच्या धरणांपैकी एक असून धरणाची लांबी 2,743.20 मीटर आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रांत चांगला पाऊस पडत असल्यामुळे अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांत मिळून बुधवारी 22 जुलै रोजी सकाळी 61.90 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.





























































